आंबेगाव: बिबट्याने नव्हे; पतीनेच केला घात, अवसरी बुद्रूकमधील घटना, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ambegaon, Pune | Oct 16, 2025 अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथील स्वीटी अक्षय बागल (वय २७) हिचा व तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू हा बिबट्याला घाबरल्यामुळे नव्हेतर पतीच्या मारहाणीमुळे झाला. याप्रकरणी पतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मंचर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.