अचानक आलेल्या पावसामुळे धबधब्याला पाणी येऊन सात जण अडकले. आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी 4 च्या दरम्यान समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल माहूर परिसरात शेख फरीद येथे दर्गा आहे. डोंगर कपारीत असलेल्या या दर्जाच्या ठिकाणी नैसर्गिक धबधबा आहे. काल काही पर्यटक या ठिकाणी आले होते. अचानक आलेल्या पावसामुळे धबधबा ओसंडून वाहू लागला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सात जण पाण्याच्या पलीकडील बाजूस अडकले होते. एक महिला, तीन मुली आणि तीन पुरुष असे सात जन अडकले होते. मानवी साखळीच्या साह्याने बाहेर काढले