उदगीर: मुक्कावार चौकात ४५ हजार १२० रुपयांची विदेशी दारू जप्त
Udgir, Latur | Oct 1, 2025 उदगीर शहर पोलिसांनी मुक्कावार चौकात सापळा रचून ४५ हजार १२० रुपयांची विदेशी दारू जप्त केली याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ३० सप्टेंबर रोजी सांयकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान आरोपीने विदेशी दारूची विनापरवाना चोरटी करण्याच्या उद्देशाने एका पोत्यात भरून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला,याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुधाकर बाबुराव केंद्रे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे