अंजनगाव–परतवाडा मार्गावरील सावळी फाट्यावर आज दुपारी २:३० वा.च्या सुमारास तीनचाकी ऑटो व चारचाकी वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात अंजनगाव सुर्जी येथील अनवर नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.परतवाडा येथून अंजनगावकडे येणारा तीनचाकी ऑटो सावळी फाट्याजवळ आला असता समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये समोरासमोर जोरदार धडक दिली.या धडकेत ४ प्रवासी जखमी असून त्यामधील अंजनगाव येथील अनवर नावाच्या वृद्धाला गंभीर मार लागल्याने त्याला उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.