कोपरगाव: कोपरगाव नगरपरिषदेचे प्रभागवाईज आरक्षण सोडत ८ ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी सुहास जगताप यांची माहिती
कोपरगाव नगर परिषदेतील प्रभागवाईज आरक्षणाचा सोडत कार्यक्रम बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे. कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद आज ओबीसीसाठी आरक्षित झाल्या असताना प्रभागातील आरक्षण 8 ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सायंकाळी 6 वाजता माध्यमांशी बोलताना सांगितले