बोदवड: चिंचाटी या गावातून भांडण झाल्याच्या रागातून घराबाहेर जाऊन विवाहिता बेपत्ता, सावदा पोलिसात हरवल्याची तक्रार
चिंचाटी या गावातील रहिवाशी अशा नसीर तडवी वय ३० या विवाहितेचे घरात किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून सदर महिला घराच्या बाहेर गेली आणि बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.