अमळनेर: अमळनेर पोलिसांची कारवाई; नंदगाव रोडवर १० किलो गांजासह धुळ्यातील एकाला अटक, गुन्हा दाखल
अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दुचाकीवरून गांजा घेऊन जात असलेल्या एकाला अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने सापळा रचून सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा आणि दुचाकी जप्त केली. याबाबत रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.