शिरपूर: चिलारे,खंबाळेसह तालुक्यातील
वनजमिनीवर ड्रोनच्या सहाय्याने गांजा शेती शोध मोहीम सुरू
Shirpur, Dhule | Oct 13, 2025 शिरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सातपुडा पर्वतरांग परिसरातील वनजमिनींवर अवैध गांजा शेतीविरोधात धुळे जिल्हा पोलिस व वन विभागाने ड्रोनच्या सहाय्याने संयुक्त मोहीम हाती घेतण्यात आली आहे.तालुका पोलीस स्टेशन हद्दीत 48 गावे व 144 लहान-मोठे पाड्यावर या मोहिमेत प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे 20 वनकर्मचारी आणि शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे 15 अंमलदार सहभागी झाले असून सदर मोहीम पुढील 1 महिना सातत्याने राबविण्यात येणार आहे अशी माहिती पो.नि.हिरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.