आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने एआयएमआयएमची सभा दि. 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान शिरपूर जैन येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी हाजी मो. युसूफ सेठ यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत निवडणूकीत घवघवीत यश संपादन करणार असल्याचे मत व्यक्त केले. सदर बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.