शहादा: बुडीगव्हाण रस्त्यावर भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघातात 4 जण जागीच ठार, एक दुचाकी जळून खाक
शहादा तालुक्यातील बुडीगव्हाण गावाजवळ भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भिषण अपघातात 4 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यात इस्मामपूर येथील उपसरपंचांचाही समावेश आहे. यात एक दुचाकी जळून खाक झाली आहे. म्हसावद येथून पाडळदा येथे जाणार्या मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातात अथित दशरथ बर्डे वय 30 रा.उमर्टी, उखड्या सुका पवार वय 51, रा.टवळाई ता.शहादा तर स्वराज सुरेश ठाकरे (वय 33 रा.फत्तेपूर ता.शहादा व लतिफ खाटीक वय 70 रा.इस्मामपूर या 4 जणांचा मृत्यू झाला.