पो स्टे रामटेक अंतर्गत रामटेक शहरात रामटेक पोलीस पेट्रोलिंग करीत असताना मनी बुवा मठाजवळ शनिवारी वार्ड रामटेक येथे 27 डिसेंबरला रात्री 2 संशयित इसम दिसून आले. संशयीत इसम पोलीस वाहन पाहून पळून जाऊ लागले. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे जवळ गुंगीकारक वनस्पती गांजा वजन 172 ग्राम किंमत 4000 रुपये व एक मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये असा ऐकून 19 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला. ही माहिती रामटेक पोलिसांनी रविवार दि. 28 डिसेंबरला सायंकाळी आठ वाजता च्या दरम्यान प्रेस नोट द्वारे दिली