जालना ते मंठा बायपास रोडवरील परिनिका हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या नाना रेसीडेन्सी येथील रो हाऊसमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.रविवार दि.1 फेब्रुवारी 2026 रोजी दु.12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत रो हाऊसचा मालक व त्याचा सहकारी अशा दोघांना अटक करण्यात आली असून पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.जालना शहरातील बायपास रोडवर नाना रेसीडेन्सी येथील एका रो हाऊसमध्ये हा प्रकाश सुरू होता.