भोकरदन: 20 सप्टे.रोजी सेवा पंधरवाडा अंतर्गत महिलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा मुख्याधिकारी तायडे यांचे न.प.येथे आ.
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी भोकरदन शहरातील सर्व महिलांना आवाहन केले आहे, की उद्या दिनांक 20 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवाडा अंतर्गत महिलांसाठी नगरपरिषदेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करून घ्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.