राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या औचित्याने सुरक्षितता विषयक जनजागृती करणे व कर्मचारी/ कामगारांमध्ये सुरक्षितता संस्कृती रुजविणे या उद्देशाने औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा येथे दिनांक ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.