तालुक्यातील जामन्यापाणी वनक्षेत्रातील दुर्गम जंगल परिसरात वनजमिनीवरील 3 नियत क्षेत्रावर मोठी धडक कारवाई करत तब्बल 1 कोटी 6 लाख 25 हजार रुपये किमतीची सुमारे 3 एकर क्षेत्रावर लागवड केलेली गांजा शेती उद्ध्वस्त केली आहे. पथकास नियतक्षेत्र भोरखेडा कंपार्टमेंट क्रमांक 1020 मध्ये 40 गुंठे,बगळाज कंपार्टमेंट नंबर 1041 येथील 37 गुंठे व 1042 येथील 45 गुंठे क्षेत्रावर गांजा झाडे लागवड केलेली आढळून आली.ती सर्व गांजा पीक जागेवरच नष्ट करण्यात आली. पुढील तपास पीएसआय सुनील वसावे करीत आहे.