हिंगणघाट: मांडगाव शिवारात पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई:१४ लाख १४ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या पथकाने मांडगाव शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर कारवाई करीत वाळूसह १४ लाख १४ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला टिप्पर क्रमांक MH 36 1670 ने मांडगाव ते वर्धा काळी रेती चोरी करून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने मांडगाव शिवार येथे नाकेबंदी केली.