गुरू तेगबहादूर यांच्या शहीद दिन निमित्त येथील गुरुद्वारात मंगळवार(ता,२५) रोजी विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.यानिमित्त सुखमनी साहीबजींचेपाठ पठण करण्यात आले, जपजी साहिब पाठ वाचन करण्यात आले.जपजी साहिब पाठ,कीर्तन, भजन,गुरु तेगबहादूर यांच्या नावाचा घोष करून जयकार करण्यात आला.आनंद साहिब यांच्या पाठाचे वाचन,नंतर सर्व उपस्थिताना लंगर जेवण देण्यात आले.