अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन आरोपींना मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोठ्या शिताफीने अटक केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम जंगल परिसरातून या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तब्बल १५ लाख ६३ हजार रुपये किमतीच्या एकूण २४ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.