उमरखेड: रिपब्लिकन सेनेमध्ये जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲड.अमन आंबेडकर साहेब हे नांदेड येथे पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्या दरम्यान ॲड. अमन आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या सूचनेनुसार, विदर्भ अध्यक्ष प्रफुल शेंडे यांच्या मार्गदर्शनात, जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील दिग्रस, महागाव ब्राह्मणगाव, चिंचोली, उमरखेड येथील शेकडो कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला.