राहाता: शिर्डीत दीपोत्सव साजरा अकरा हजार दिव्यांनीउजळली साईनगरी....!
साईबाबांच्या शिर्डीत दिवाळी सणाला आगळवेगळ महत्व आहे.. दिवाळीला दिवे पेटवण्यासाठी तेल न मिळाल्यानं साईबाबांनी पाण्यानं दिवे पेटवले.. आणि यामुळेच साईंच्या व्दारकामाई समोर भाविक आज ही दिवे प्रज्वलित करुन दिवाळी साजरी करतात.. यंदा साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांनी 'शंकर मेरे साईनाथ' ही थीम घेवून अकरा हजार दिव्यांचा आनोखा दीपोत्सव साजरा केलाय..