नागभिर: नागभीड नागपूर ब्रॉडगेज मार्गाला पूर्णत्वास मिळणार गती शासनातर्फे 491 कोटी 5लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी
नागपूर येथील रयतवारी ते नागभीड दरम्यानच्या 116 किलोमीटरच्या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेच मार्गात रूपांतर करण्यात येत आहे या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने आपला हिस्सा म्हणून रेल्वेला 491 कोटी 5 लाख रुपये देण्यास मंजुरी दिली शासनातर्फे निधी मंजूर झाल्यामुळे निश्चितच इतवारी नागभीड ब्रॉडगेज मार्ग लवकरच पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे