महाड नगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच मोबाईल वरून मतदारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी आमदार प्रविण देरेकर काल महाडमध्ये उपस्थित होते. यावेळी प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. या वेळी कमळ आणि घड्याळ चिन्हां समोरील बटन दाबुन युतीच्या उमेदवारांना निवडुन देण्याचे अवाहन फडणवीस यांनी केले.