हिंगणा: भीम नगर येथे पत्नीला जीव ठार मारणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Hingna, Nagpur | May 30, 2025 शितल जॉन्सन मंडपे, वय ४० वर्षे यांचा १५ वर्षापुर्वी आरोपी जॉन्सन प्रल्हाद मंडपे, वय ४९ वर्षे, रा. भिमनगर, याचेसोबत रितीरिवाजाने विवाह झाला होता. आरोपीचे दुसऱ्या महीलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे कारणावरून पती-पत्नीचा नेहमी वाद होत असल्याने ते एकाच घरामध्ये वेगवेगळे राहत होते. आरोपीची पत्नी सौ. शितल हि घरी जखमी अवस्थेत पडुन दिसल्याने तिला उपचाराकामी एम्स हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून नृत्य घोषित केले होते. तपासाअंती तिच्या खून झाल्याचे स्पष्ट झाले.