आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल की नाही, या विवंचनेत असलेल्या २१ नागरिकांसाठी आज ३१ डिसेंबरचा दिवस आनंदाचा ठरला. काटोल उपविभागातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण २१ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, आज हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या हस्ते हे मोबाईल सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.