शिरपूर तालुक्यातील व्हीपसिंग पावरा हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले असताना, आरोपींकडून केली जाणारी विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची मागणी हे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मयताच्या विधवा पत्नी व नातेवाईकांनी केला आहे. धुळे साक्री रोड पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा तपास भरकटवण्याचा डाव असल्याचे म्हटले.