खुलताबाद: शिक्षणाला तिलांजली, पोटासाठी कसरत,वेरूळमध्ये मराठवाडा मुक्ति संग्रामदिनी विकसित भारताचे विदारक वास्तव उघड
आज दि १७ स्पटेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या निमित्ताने शालेय परिसरात विद्यार्थ्यांची ध्वजारोहणाची धावपळ सुरू होती. देशभक्तीपर गीते आणि कार्यक्रमाच्या तयारीचा उत्साह वातावरणात भरला होता. तेवढ्यात अचानक एका महिलेने तिच्या ७ वर्षांच्या मुलीसह येत दोन खांबे रोवून दोरी बांधली आणि क्षणातच ते दृश्य साऱ्यांचे लक्ष वेधून गेले.सदर चिमुरडी काही क्षणांतच गाण्यांच्या आवाजात लिलया त्या दोरीवर चालू लागली. एका बाजूला शाळेतील विद्यार्थी देशभक्तीच्या जयघोषात मग्न होते.