भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी सर्व्हिस रोडवर एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला लुटल्याची खळबळजनक घटना दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते २:३० वाजेच्या दरम्यान घडली आहे. फिर्यादी श्रीमती सुमन माणीकराव घाटोळे (रा. खरबी) या पायदळ चंद्रभागा लॉनकडे जात असताना, अंदाजे २२ ते २५ वर्षे वयोगटातील तीन अनोळखी युवक आणि एका महिलेने संगनमत करून त्यांना अडवले. आरोपींनी वृद्धेच्या गळ्यातील ३४ ग्रॅम वजनाचे मोठे मंगळसूत्र आणि ३ ग्रॅम वजनाचे लहान काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, असे एकूण ३७ ग्रॅम वजनाचे ९२,