पंचायत समिती रामटेक अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या वेळोवेळी निवेदन देऊनही त्या प्रलंबित आहेत.याकडे लक्ष वेधक मंगळवार दि. 20 जानेवारीला दुपारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रामटेकच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती रामटेक चे बीडिओ जयसिंग जाधव यांना निवेदन देऊन मागण्या निकाली काढण्याची मागणी केली.