माळशिरस: माजी आमदार राम सातपुते यांनी पोलिसांना खंडणी मागितली; आमदार उत्तमराव जानकर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी पोलिसांना खंडणी मागितली होती, असा आरोप माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केला आहे. सांगली येथे ते याबाबत बोलत होते. याबाबत त्यांचा व्हिडिओ आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. आज सकाळी दहा वाजता त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सोशल मीडियावर दिसून आले.