मुख्यमंत्री पंचायतराज ग्राम समृद्धी अभियानांतर्गत पवनी तालुक्यातील अड्याळ गावात तब्बल १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी ग्रामसफाई अभियान राबवून अड्याळने स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे सरपंच शिवशंकरजी मुंगाटे यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरून ग्रामसफाई केली. केवळ आदेश देऊन नव्हे तर कृतीतून नेतृत्व दाखवत त्यांनी गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेची चळवळ उभी केली.