जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या प्रेरणेने जालना जिल्ह्यात महिला सुरक्षा, सायबर गुन्हेगारी, अँटी रॅगींग, नशामुक्ती आदी विषयांवर जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शनिवार दि. 13 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अंतर्गत जनजागृती वाहनांच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या पथकाने छत्रपती शिवाजी विद्यालय रेवगाव तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवगाव येथे भेट दिली.