सिल्लोड: धानोरा येथील नागरिकांचा वाळू बंद करण्यासाठी तहसीलदार बिडिओ यांना घेराव व्हिडिओ झाला समाज माध्यमांवर व्हायरल
आज दिनांक 16 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे तहसीलदार सतीश सोनी व बिडिओ रत्नाकर पगार यांना धानोरा येथील स्थानिक नागरिकांनी घेराव करत वाळू तस्करांना पाठीशी घालून वाळू तस्करीत सामील असल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर करत नागरिकांनी घेराव घालून विविध प्रश्न विचारले सदरील व्हिडिओ आज रोजी सिल्लोड तालुक्यातील सोशल मीडिया वरती व्हायरल झाला आहे