लाखनी: लाखनी येथील आमदारांच्या जनता दरबार उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद ; नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा !
१८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लाखनी येथे आमदार डॉ परिणय फुके यांच्याद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या, मागण्या आणि सूचना मांडल्या. या दरम्यान आमदार डॉ परिणय फुके यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांच्या अपेक्षा तातडीने पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रशासन व स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात आला.