लोणार: लोणार ते लोणी रस्त्यावर भरधाव मिनीबस ट्रॅव्हल्सच्या धडकेत युवक ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Lonar, Buldhana | Oct 31, 2025 लोणार ते लोणी रस्त्यावर भरधाव मिनीबस ट्रॅव्हल्सने युवकास जोरदार धडक दिल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली. रमेश काळुराम मरमट असे मृतक युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चेतन प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिनीबस ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध लोणार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ३१ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.