उमरी: धावत्या ट्रेनमध्ये रक्तरंजीत थरार,एका हाॅकर्सने दुसऱ्या हाॅकर्सचा चाकुने भोसकून केला खुन;उमरी ते धर्माबाद दरम्यानची घटना
Umri, Nanded | Nov 11, 2025 अकोला ते काचीगुडा दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये किरकोळ कारणावरून एका हाॅकर्स तरुणाचा खंजरने भोसकुन खून झाल्याची घटना 10 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी पावणे चार ते चार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आतिश अशोक हैबते वय 30 वर्ष रा. रापतवारनगर उमरी जिल्हा नांदेड असे या घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास उमरी स्थानकात इंटरसिटी एक्सप्रेस आली असता मयत तरुण हा या गाडीमध्ये पाणी बॉटल विक्री करण्यासाठी चढला पाणी देण्याच्या