देशातील अनेक वैज्ञानिकांनी नवनवीन इनोव्हेटीव्ह समोर आणून देशाचे नावलौकिक केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे, यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनी उपयुक्त ठरत आहे. बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक असून त्यांना चालना देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.