पवनी नगरपरिषद निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित शिलेदारांनी लाखनी येथे आमदार डॉ. परिणय फुके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता, विजयाचा उत्साह आणि विकासाचा संकल्प यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. यावेळी आमदार फुके यांनी सर्व विजयी नगरसेवकांचे कौतुक करत त्यांची पाठ थोपटली आणि शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा जाहीर सत्कार केला.