आज दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत 'स्वीप' (SVEEP) उपक्रमांतर्गत मोहिमेचा वेग वाढवण्यात आला आहे. आज शहरातील शैक्षणिक संस्था, रेल्वे स्टेशन परिसर, सार्वजनिक उद्याने आणि आठवडी बाजारात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. महाविद्यालयीन तरुणाईची 'मानवी साखळी' अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य जनजागृती