समुद्रपूर: बाहेर राज्यातून वाहत होत असलेल्या सुगंधित तंबाखु व पान मसाल्यावर कारवाई::शेडगाव चौरस्तावरील घटना
समुद्रपूर तालुक्यातील नागपूरकडून वर्ध्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेडगाव चौरस्तावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून बाहेर राज्यातून वाहतूक होत असलेल्या सुगंधित तंबाखु व पान मसाल्यासह १० लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ४ जणांना अटक केली.प्राप्त माहितीनुसार रात्रीच्या सुमारास शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखु व पान मसाला बाहेर राज्यातून नागपूर कडून वर्ध्याकडे वाहतूक होत असलेल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकाला मिळताच पथकाने कारवाई केली.