खुलताबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कमान मोहल्ल्यात आयोजित भव्य सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. राष्ट्रवादीच्या सभेत स्टार प्रचारक आमदार सना मलिक यांनी भाषण करताना, “भाजपसोबत आमची युती फक्त राजकीय आहे, विचारांची नाही,” असे प्रतिपादन केले.अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव कटिबद्ध असून लाडकी बहिण योजना अखंड सुरू ठेवण्याचे आश्वासन पूर्ण केल्याची आठवण त्यांनी करून दिली.