जालना: जालना महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 34 हरकती व सूचना प्राप्त..
Jalna, Jalna | Sep 16, 2025 जालना महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर 34 हरकती व सूचना प्राप्त आज दि.16 मंगळवार रोजी सकाळी 9:00 वा. च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. दिनांक 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत नागरिकांकडून एकूण 34 हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. यापैकी दि. 15 सप्टेंबर रोजीच तब्बल 20 हरकती व सूचना प्राप्त झाल्या.