आर्णी: कोसदनी घाटात दुदैवी अपघात; ट्रॅक च्या धडकेत 4 गायी जागीच ठार तर 3 गायी गंभीर जखमी
Arni, Yavatmal | Nov 10, 2025 नागपूर तुळजापूर मार्गावरील कोसदनी घाटात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. यवतमाळवरून नांदेडकडे भरधाव वेगात जाणाऱ्या १२ टायर ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या गायींच्या कळपावर धडक दिली. या अपघातात चार गायी जागीच ठार झाल्या असून तीन गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात आज दि १० नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडला. ट्रकचा वेग अतिशय जास्त असल्याने चालकाला नियंत्रण सुटले आणि गायींच्या कळपावर थेट ट्रक घुसला. अपघातानंतर ट्रक काही अंतरावर थांबला, मात्र दृश्य पाहून उपस्थित नागरिकांनी