मौजा हौसिंटोला येथे आयोजित भव्य कबड्डी टूर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती रामेश्वर महार वाडे उपस्थित होते. कबड्डी हा केवळ खेळ नाही,तर शिस्त,एकजूट,संघर्षशीलता आणि संघभावनेचे प्रतीक आहे. आपल्या गावातील तरुणाईने क्रीडाक्षेत्रात उंच भरारी घ्यावी,हाच माझा मनापासून प्रयत्न आहे.या स्पर्धेतून अनेक गुणी खेळाडू पुढे येतील ,व युवा पिढीने खेळासोबत शिक्षण,संस्कार आणि सामाजिक जबाबदारी जोपासत गाव-तालुका जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन महारवाडे यांनी केले.