आज दिनांक 7 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून गंगापूर तालुक्यातील ११ ऐतिहासिक बारवांच्या संवर्धन व जीर्णोद्धार कामांचा शुभारंभ गणेशवाडी येथे उत्साहात पार पडला. २ कोटी ८८ लाख रुपयांच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन श्री क्षेत्र देवगडचे भास्करगिरी महाराज, रमेश महाराज वसेकर तसेच इंदौर राजघराण्याचे वंशज श्रीमंत मुकुंदसिंह राजे होळकर यांच्या शुभहस्ते झाले.