भूम: उपविभागीय कार्यालयासमोर शिवाजी काळे यांचे आमरण उपोषण पोलीस संरक्षण देण्याची केली मागणी
भूम शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर शिवाजी सोपान काळे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आमरण उपोषण करत आहेत. बायडाबाई काळे यांनी त्यांचे 13 तोळे सोने व चार लाख रुपये लंपास केले असून माघारी मागितले असता त्यांच्यावर खोटी केसही दाखल केली आहे. फसवून नेलेली रक्कम मिळावी व पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी शिवाजी काळे यांनी केली आहे त्यांनी 15 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच आमरण उपोषण सुरू केले आहे.