कन्नड: फर्निचर खरेदीसाठी जमीनी भाड्याने द्या – माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा जिल्हा परिषदेला सल्ला
जिल्हा परिषदेची नवीन इमारत पूर्ण तयार असूनही तेथे अद्याप फर्निचर उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्याची स्थिती बिकट असल्याचे माजी आमदार तथा रायभान जाधव विकास आघाडीचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्यांना चटई टाकून बसावे लागेल, अशी टीका त्यांनी केली.जाधव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती केली की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या जागा भाडे तत्वावर द्याव्यात.