नागपूर ग्रामीण: ओंकार नगर येथे फटाक्यामुळे नर्सरी जळून झाली खाक
ओंकार नगर येथे फटाक्यामुळे आग लागल्याने संपूर्ण नर्सरी जळून खाक झाली आहे. आग लागण्याची माहिती वरून तायडे यांनी अग्निशमन विभागाला दिली होती अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून कार्यवाही केली आणि संपूर्ण आगवर नियंत्रण मिळविले. या आग लागण्याचे काही ठराविक व्हिडिओ देखील समोर आले आहे. या आत मध्ये संपूर्ण नर्सरीतील झाडे जळून खाक झाली. तर काही प्रमाणात झाडे व इतर साहित्य वाचवण्यात अग्निशमन विभागाच्या पथकाला यश आले आहे.