दहशतवाद विरोधी शाखेने (एटीएस) भोकरदन रोड परिसरात राबवलेल्या कारवाईत एका तरुणाला गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार शस्त्र व मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे. बुधवार दि. 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 1 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दि. 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती.