सिंदखेड राजा: मलकापूर पांग्रा जवळ समृद्धी महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात चाकाखाली आल्याने एक जण ठार,महिला गंभीर जखमी
मलकापूर पांग्रा जवळ समृद्धी महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण जागीच ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २२ आक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. यामध्ये, ट्रकचे टायर तपासत असताना क्लिनर चाकाखाली आल्याने तो जागीच ठार झाला. अन्य एका अपघातात भरधाव कार कंटेनरवर आदळल्याने महिला गंभीर जखमी झाली.शाहरुला मंडल असे मृतकाचे नाव आहे.