वर्धा: कोटंबा ग्रामपंचायतीकडून दिव्यांग निधीचे वाटप; १७ लाभार्थ्यांना दिले धनादेश
Wardha, Wardha | Nov 20, 2025 कोटंबा ग्रामपंचायतीत पाच टक्के दिव्यांग निधीअंतर्गत एकूण १७ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचे आयोजन ता. २० गुरुवारला दुपारी १ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक नंदनवार होते. यावेळी ग्रामसेवक भगवान कंठाळे, माजी सरपंच सौ. रेणुका कोटंबकार तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.